मका पिकाच्या ठिकरी, भुसा विक्रीतून तरुणांनी शोधला रोजगार

यंदा अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात मका पिकाचे नुकसान झाले. या मका पिकापासून आता तरुणांनी रोजगार शोधला असून, मका बिटीमधून निघणाऱ्या ठिकरी आणि भुसा यांना मोठी मागणी असल्याने त्यांच्या विक्रीतून रोजगार उपलब्ध केला आहे. तालुक्यात शंभरहून अधिक तरुण या व्यवसायाकडे वळाले आहेत. गेतवर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातही मका पिक घेतले परंतुअवकाळी पावसाने घातलेला धुमाकूळ यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आता नुकसानग्रस्त पिकातूनही युवकांनी रोजगार शोधला आहे.

गैरहजर ग्रामसेवकांवर आता पुणे जिल्हा परिषद करणार कारवाई

या व्यवसायात दररोज दोन ते तीन हजार रुपये एका गाडीला मिळत असल्याने तरुणांच्या हाताला काम मिळाले आहेत. शेतीबरोबरच ठिकरी व्यवसायही सांभाळला जात असल्याने अनेक शेतकरी कुटुंबांना उदरनिर्वाहाचे आणखी एक साधन मिळाले आहे. सदर मका ठिकरी अंगणगाव, नागडे, सिन्नर, शिंदे-पळसे, धुळगाव फाटा या ठिकाणी विक्रीसाठी नेला जात आहे. दरम्यान, सध्या शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला मका काढत असून, दिवसेंदिवस मका भावात घसरण होत असल्याने शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र दिसून येत आहे.