सातबारा नसल्याने पशुपालक तसेच भूमिहीन मजूर सरकार कडून मिळणाऱ्या लाभांपासून वंचित

जालना – सातबारा असणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ घेता येतो, मात्र जे पशुपालक आहेत किंवा ज्यांच्याकडे जमीन नाहीत त्यांच्याकडे सातबारा नसतो, अशांना सरकारी योजनांचा लाभ नाही घेता येत. या सातबारा अभावी अनेक पशुपालक तसेच भूमिहीन मजूर सरकार कडून मिळणाऱ्या लाभांपासून वंचित आहेत, यांच्यासाठी काही तरी योजना करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

भूमिहीन मजूर शेत मजूर म्हणून कामावर जाताना आपले पशु सोबत घेऊन जातात तिथे पशूंच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवला जातो परंतु सध्या चाऱ्याचा प्रश्न सुद्धा गंभीर झाला आहे, त्यामुळे पशुधन सांभाळणे कठीण काम झाले आहे. आता या कुटुंबाला आधार देणारे पशुधन कसे सांभाळायचे असा प्रश्न पशुपालाकांना पडला आहे. पशुसंवर्धन विभाग असले तरी त्यांच्या योजना जमीन असणाऱ्या पशुपालकांना मिळतात. त्यामुळे भूमिहीन मजुरांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे तसेच पशुपालाकांचे सातबारा असल्याने त्यांना सरकारी योजनांचा लाभ घेता येतो, मात्र भूमिहीन मजुरांसाठी सुद्धा सरकारने काही उपाययोजना सुरु कराव्यात, त्यामुळे त्यांचे दैनंदिन जीवन सुरळीत होण्यास मदत होईल तसेच त्यांच्या पशुधनांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचा प्रश्न सुद्धा मार्गी लावावा अशी मागणी सध्या होत आहे.

महत्वाच्या बातम्या –