राज्यातील ‘या’ जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

कोरोना

जालना – जालन्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात १३७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर पाच जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. विषेश म्हणजे सोमवारी एकट्या जालना शहरातील ६२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांनी अधिकची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नियम मोडणाऱ्या नागरिकांना आवर घालण्यासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. यात विनामास्क नागरिकांवर थेट दंडात्मक कारवाया करण्यात येत आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात सोमावारी आढळलेल्या रुग्णांमध्ये जालना शहरातील ६२ रुग्णांसह सावरगाव १, बठाण १, जामवाडी १, नंदापूर १, मंठा तालुक्यातील जयपूर २, लावणी २, परतूर ८, वाटूर फाटा ४, घनसावंगी तालुक्यातील राठी आंतरवाली १, अवलगाव २, अंबड ३, बारसवाडा ३, बदनापूर १, जाफराबाद तालुक्यातील देऊळगाव उगले १, शिराळा १, निवडुंगा १, सावंगी २, भोकरदन १, जयदेववाडी १४, राजूर १ तसेच बुलडाणा ६ अशा प्रकारे आरटीपीसीआर तपासणीद्वारे ११९ तर अँटिजन तपासणीतून १८ असे मिळून १३७ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा १४ हजार ६६५ वर पोहोचला आहे. यातील १३ हजार ७३२ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. तर, ३८४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

जिल्ह्यातील व्यायामशाळा, मंगल कार्यालये, रेस्टॉरंट, धार्मिक स्थळे, खेळाचे मैदान आणि शॉपिंग मॉल्स अशा ७६ ठिकाणी नगरपालिका, नगरपंचायत आणि पोलिस पथकांनी भेटी देऊन नियम मोडणाऱ्यांना नोटिसा दिल्या. या वेळी कोरोनाचे नियम पाळण्यासाठी समज देण्यात आली. तसेच दिवसभरात जिल्ह्यातील ६७ नागरिकांनी कोरोनाचे नियम मोडले. यापैकी ३५ जणांकडून १६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या –