‘या’ जिल्ह्यातील आठवडे बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

बाजारसमिती

नांदेड – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाने शहरासह जिल्ह्यात अंशतः: लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयमध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची गुजराण होणाऱ्या आठवडी बाजार बंदीमुळे शेतकरी आपल्या भाजीपाल्याची मातीमोल भावाने विक्री करत आहे असे दसून येत आहे. त्यामुळे मोठे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

नांदेड जिल्ह्यात मार्च महिना चालू होताच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला. फेब्रुवारीत खालावलेली संख्या मार्च चालू होताच दोन अंकावरील संख्या तीन अंकावर पोचली आहे. दरम्यान ११ मार्च रोजी २५० वर संख्या पोचल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी १२ ते २१ मार्च दरम्यान अंशतः: लॉकडाऊनची घोषणा केली आहे यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

नांदेड शहरासह ग्रामीण भागात भरणाऱ्या आठवडी बाजार बंद झाले आहे. यामुळे उन्हाळ्याचे नियोजन करून पिकविलेल्या भाजीपाला उत्पादकांसह फळे पिकविणारे शेतकरी अडचणीत आले असल्याचं दिसत आहे. बाजार बंद असल्यामुळे व्यापारी टरबुजाचे दर पाडत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितल आहे.

महत्वाच्या बातम्या –