राज्यात आज रात्री ८ वाजेपासून लॉकडाऊन; जाणून घ्या काय सुरु, काय बंद राहणार?

बंद

मुंबई – कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा करतांना या काळात आर्थिक दुर्बल घटकांना याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देणारे ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. राज्यात बुधवार दि १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील व या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. केवळ आवश्यक सेवा सुविधा सुरु राहतील. यासंदर्भातील ब्रेक दि चेनचे नवे आदेश प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

राज्यात मार्च २०२१ पासून कोविड-१९ ची दुसरी लाट आली असून या लाटेमध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रुग्णांची संख्या कमी करण्याची गरज म्हणून कडट टाळेबंदी लागू करण्यात येत आहे. पण या काळात आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी अन्नधान्य आणि आर्थिक सहाय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संकटाचा मुकाबला करताना शासन गरजूंच्या पाठिशी उभे आहे. याकाळात कुणाचीही आबाळ होऊ देणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

राज्यावरील कोरोनाचे संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार दि १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून दि १ मे च्या सकाळी ७ पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. १४४ कलम लागू करण्यात आले आहे.दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांना दिलासाही देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देखील घेण्यात आले आहेत. जीवनावश्यक बाबींवर कुठलेही निर्बंध न ठेवता इतर महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करून निर्बंध जारी करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत काय सुरू राहील व काय बंद असेल, कुठल्या सेवा, आस्थापना सुरू असतील, कुठल्या बाबींसाठी सूट असेल आदींबाबतची माहिती जारी करण्यात आलेल्या नियमावलीत देण्यात आली आहे.

काय राहणार सुरु ?

 • अत्यावश्यक सेवेतील उद्योग व कारखाने
 • पशुवैद्यकीय सेवा, प्राण्यांसाठीची निवारा केंद्रे, खाद्यपदार्थांची दुकाने
 • अन्नधान्य, भाज्या, फळे, दूध विक्रेते, बेकरी आणि खाद्यपदार्थांचे विक्रेते
 • शीत साखळी आणि गोदामे
 • सार्वजनिक वाहतूक (अत्यावश्यक सेवांसाठी)
 • पावसाळ्यापूर्वीची कामे
 • स्थानिक प्रशासनाच्या सर्व सार्वजनिक सेवा
 • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, वित्तीय संस्था, सेबी
 • दूरसंचार सेवा
 • मालाची वाहतूक, पाण्याचा पुरवठा
 • कृषीशी संबंधित कामे
 • सर्वप्रकारच्या वस्तूंची आयात-निर्यात
 • ई- कॉमर्स आणि मान्यताप्राप्त माध्यमे
 • पेट्रोल पंप
 • सर्वप्रकारच्या कार्गो सेवा
 • डेटा सेंटर आणि आयटी कंपन्या
 • सरकारी आणि खासगी सुरक्षा सेवा
 • इलेक्ट्रिक आणि गॅस पुरवठा सेवा
 • एटीएम
 • टपाल कार्यालये
 • बंदरे आणि त्याच्याशी संबंधित सेवा
 • जीवनरक्षक औषधांची वाहतूक
 • जीवनावश्यक वस्तूची निर्मिती करणारे कारखाने
 • आपत्ती व्यवस्थापनाची कामे, सेवा

काय राहणार बंद

 • धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम
 • चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सभागृह
 • व्हिडिओ गेम पार्लर, वॉटर पार्क, मनोरंजन पार्क, जलतरण तलाव, जिम, क्रीडा संकुले
 • चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण
 • जीवनावश्यक सेवेत न येणारी सर्व दुकाने, मॉल, शॉपिंग सेंटर
 • बागा, समुद्रकिनारे, मैदाने
 • धार्मिक ठिकाणे, प्रार्थनास्थळे
 • सलून, स्पा, ब्युटी पार्लर
 • सर्व शाळा, महाविद्यालये (राज्याबाहेरील बोर्ड, विद्यापीठांच्या परीक्षा संबधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सूचनेनुसार होणार)
 • सर्व खासगी कोचिंग क्लास

महत्वाच्या बातम्या –