कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत असल्यामुळे राज्यातील ‘या’ १४ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागण्याची शक्यता

बंद

मुंबई – कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चाललेला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तरी देखील अनेक नागरिक कोरोनाच्या नियमनाचे पालन करताना दिसत नाही. लोकांना गांभीर्य नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

२०२० मधील देशव्यापी लॉकडाऊनच्या घोषणेला आज एक वर्ष पूर्ण होत असतानाच महाराष्ट्राच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वेगाने होणारा कोरोनाचा प्रसार लक्षात घेतला, राज्य सरकार हे पाऊल उचलण्याची शक्यता आहे.

नांदेड, परभणी आणि बीड या जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीपासून लॉकडाऊन ची घोषणा करण्यात आलेली आहे. तसेच राज्यातील अन्य १४ जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, जळगाव, जालना, अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. जर राज्याचा विचार केला तर एकट्या मार्च महिन्यामध्ये आतापर्यंत ३ लाख ४३ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार ३०० जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे दोन दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी कदाचित महाराष्ट्रामध्ये पुढील काळामध्ये वाढती रुग्ण संख्या पाहता पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर आज कॅबिनेट बैठकीत संपूर्ण राज्याचा आढावा घेतला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या –