महावितरांमुळे ‘या’ गावच्या शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

महावितरण

बीड – महावितरण आणि त्याच्या कारभार सर्व श्रुत आहे. ढिसाळ कामकाजासाठी प्रसिद्ध असलेल्या महावितरांमुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशीच एक बीड येथे घडली तालुक्यातील उपळी व परिसरातील नागरिक हे महावितरणच्या गलथान कारभारामुळे अडचणीत सापडले असून गेल्या चार ते पांच दिवसापासून थ्री फेज विद्युत पुरवठा नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या एक वर्ष भरापासून भारतात कोरोना या विषाणुने थैमान घातलेले असतांना लॉकडाऊन सारखे संकट नागरिकांवर आले. त्यात अनेक शेतकाऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यावर व सामान्य नागरिकावर आर्थिक संकट आले असताना पुन्हा महावितरणचे थकीत बील न भरणाराचे कनेक्शन तोडण्यात आले. या वर्षी पाऊस चांगला झाल्याने काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला परंतु पुन्हा अस्मानी संकट या शेतकऱ्यांच्या डोक्यावर आले व वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला.

आता शेतकऱ्यांना शासनाची काही मदत मिळेल व काही प्रमाणात राहिलेले पीक हे शेतकऱ्यांना थोड्या फार प्रमाणात दिलासा देईल या हेतूने शेतकरी राहिलेल्या पिकांना शेतात राबून, कष्ट करून या पीकांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असताना पुन्हा चार ते पाच दिवस या गावात व शेतातील लाइट नसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

महत्वाच्या बातम्या –