महाराष्ट्रात 18 ते 20 मार्चला वादळी वाऱ्याचा पाऊस होण्याची शक्यता

पाऊस

मुंबई – राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना आता आणखी एक चिंता करणारी बातमी समोर आली आहे. राज्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे.केरळ ते मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा होता. तो सध्या विरुन गेलाय. पश्चिमी चक्रवातामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांत पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रात 18 ते 20 मार्च या काळात हलक्या आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय, एक-दोन दिवसांत कमाल तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. देशात महाराष्ट्रासह मध्ये प्रदेशमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. विदर्भात तर वादळी वाऱ्याचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र वाढ झालीय. आधीच बिघडलेली आर्थिक स्थिती आणि त्यात आता अवकाळी पावसाने शेतीवर होणारा विपरित परिणाम यामुळे शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिसा या राज्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासात उत्तर भारतातील पर्वतीय भागात पाऊस होण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रात नाशिक, जळगाव आणि पुणे जिल्ह््यांत काही ठिकाणी, मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी आणि बीड जिल्ह््यांत, विदर्भात नागपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह््यांत पावसाचा अंदाज आहे. कोकणातील रत्नागिरी आणि रायगड येथेही काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राज्यातील अनेक भागांत वातावरणात बदल होऊ लागले आहेत. काही भागांत अंशतः ढगाळ हवामान आहे. यामुळे उकाडा वाढला असून, कमाल तापमानात चांगली वाढ झाली आहे. उद्यापासून वातावरणात आणखी बदल होऊन पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –