बीड – बीड जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. याचा फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. राज्य सरकारने नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली आहे.
गुरुवारी मध्यरात्रीपासून बीड जिल्ह्यात सर्वच ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वारे, गारपिट आणि मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. आज शुक्रवारीही अनेक ठिकाणी पाऊस झाला. अवकाळी पावसाने सर्वच तालुक्यांना झोडपून काढले. यामुळे बहरलेल्या आंब्याचा मोहर उद्धवस्त झाला. डाळिंब, पपई, द्राक्षे या फळबागांचे त्याचप्रमाणे ज्वारी, हरभरा, गहू या रब्बी पिकांचेही प्रचंड मोठे नुकसान झाले. काढणीला आलेले हे पीक अक्षरशः भूईसपाट झाले.
शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने यामुळे हिरावून नेला आहे. अचानक आलेल्या या संकटाने शेतकरी पुर्णपणे कोलमडला आहे. सरकारने या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना या नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आर्थिक मदत करावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- मोठी बातमी – राज्यातील ‘या’ २८ जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह मुसळधार पावसाचा इशारा
- राज्यातील ‘या’ सात जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
- मोठी बातमी – राज्यातील ‘या’ जिल्ह्यात अचानक झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
- मोठी बातमी – राज्यात कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता
- महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२१ ची २० मार्चला परतफेड