वीजपुरवठा खंडित करण्याचा जुलमी निर्णय महाविकास आघाडी सरकारने त्वरीत मागे घ्यावा – आ. संतोष दानवे

संतोष दानवे

जालना – राज्यातील ७२ लाख वीज जोडण्यांचा पुरवठा खंडित करण्याचा जुलमी निर्णय महाविकास आघाडी सरकारने त्वरीत मागे घ्यावा, अन्यथा भाजपच्या वतिने जिल्हाभरात महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करतील, असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांनी दिला आहे.

आघाडी सरकारला मनमानी कारभार करू देणार नाही

आमदार संतोष दानवे म्हणाले की, राज्यातील जनतेला कोरोनाकाळातील वीज बिल माफ करण्याचे आश्वासन देणारे सरकारने आता थकीत बिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सरकार किती असंवेदनशील आहे हे आता जनतेला समजले आहे. मात्र, आम्ही या आघाडी सरकारला मनमानी कारभार करू देणार नाही. भाजपकडून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महावितरणच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच वीजपुरवठा खंडित करण्यास येणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना भाजप अटकाव करेल असा इशारा दानवे यांनी दिला आहे.

रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिके जोमात

नैसर्गिक संकट, अतिवृष्टी, कोविड-१९ अशा संकटातून शेतकरी सावरत कसेबसे सावरत आहेत. रब्बी हंगामातील गहू, हरभरा व इतर पिके वीजपुरवठा खंडित केल्यामुळे हातून जाण्याची भीती आहे. शेतकऱ्यांवर आर्थिक संकटाचा विचार करून शेतकऱ्यांची कृषिपंपाचे वीज कनेक्शन कट करू नये, ज्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केले आहे अशा शेतकऱ्यांचा वीजपुरवठा तत्काळ सुरू करण्यात यावा. जनावरांची पाणी पिण्याची गैरसोय होणार नाही यांची दक्षता घेण्यात यावी. कापूस, मूग व मका पिकाचे उत्पादन ५० टक्केही शेतकऱ्यांच्या हातात आले नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात यावे, असे आमदार संतोष दानवे यांनी निवेदनात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या –