राज्यातील ‘या’ तीन जिल्ह्यात खरबूज ९०० ते १५०० रुपये क्विंटल

खरबूज

पुणेमध्ये खरबूज १२०० ते १५०० रुपये क्विंटल

पुणे – वाढत्या उन्हाळ्यामुळे गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरबुजाची आवक वाढू लागली आहे. गुरुवारी (ता.२५) खरबुजाची सुमारे ३० टेम्पो आवक झाली होती. यावेळी आवक आणि मागणी संतुलित राहिल्याने प्रति किलोला १२०० ते १५०० रुपये दर होता.
खरबुजाची आवक ही प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, बारामतीसह सोलापूर जिल्ह्यातून होत आहे. गेल्या आठवड्यात आवक आणि दर स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

नाशिकमध्ये खरबूज ९०० ते १५०० रुपये क्विंटल

नाशिक – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.२४) खरबुजाची आवक २२० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान ९०० ते कमाल १५०० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १२०० रुपये होते. सध्या आवक सर्वसाधारण आहे. मागणी वाढत आहे. मात्र अद्याप दर कमीच आहेत, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

जळगावात खरबूज ११०० ते १५०० रुपये क्विंटल

जळगाव ः जिल्ह्यात खरबुजाची आवक बाजार समित्यांमध्ये अत्यल्प होत आहे. लागवड बऱ्यापैकी झाली आहे. सध्या काढणीला सुरवात होत आहे. सुरवातीलाच किमान ११ व कमाल १५ रुपये प्रतिकिलोचा दर थेट शिवारात शेतकऱ्यांना मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या –