हवामान विभागाचा अंदाज – 27 ते 30 जानेवारी दरम्यान ‘या’ भागात थंडीची लाट येणार

थंडी

मुंबई –  हवामान Weather विभागाचा अंदाज  पुढील २ ते ३ दिवस राज्यात थंडीचा कडाका वाढणार आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. राज्यातील  मुंबई भागात 16 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर राज्यातील नाशिक, पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये  25 अंशाखाली कमाल तापमान नोंदवल्या गेलं आहे. तर  धुळीच्या वादळाचा परिणाम देखील दिसून आला. मुंबईसोबतच राज्यातील  अनेक भागात पश्चिमी चक्रवातामुळे पुढील तीन ते चार दिवस तापमानात घट होईल असा अंदाज हवामान विभागाने दिली आहे.  पुढच्या काही दिवसांमध्ये पारा आणखी खाली घसरणार असून थंडीची लाट येणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येणार्‍या पुढच्या पाच दिवसात उत्तर पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांशी भागामध्ये किमान तापमानात तीन ते पाच अंशांनी घट होण्याची शक्यता आहे तर  26 जानेवारी रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

27 ते 30 जानेवारी दरम्यान उत्तर प्रदेशात कोल्डवेव्ह/तीव्र थंडीची लाट येण्याचा अंदाज आहे तसेच पुढील 2 दिवसांत उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, गुजरात याच प्रमाणे हवामानात बदल दिसून येतील.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत गेल्या दशकभरातील सर्वात थंड जानेवारी महिना आहे. सोमवारी शहराचे किमान तापमान 6 अंश सेल्सिअसने घसरले आणि आज मंगळवारी ते 14 अंशांवर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता .IMD नुसार, पुढील दोन दिवस महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील एकाकी भागात थंडीची लाट येण्याचा अंदाज आहे.पुढील 5 दिवसांत मध्य प्रदेशात थंडीची लाट/तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. 27 ते 30 जानेवारी दरम्यान उत्तर प्रदेशात कोल्डवेव्ह/तीव्र थंडीची लाट येण्याचा अंदाज आहे तसेच पुढील 2 दिवसांत उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, गुजरात याच प्रमाणे हवामानात बदल दिसून येतील.

महत्वाच्या बातम्या –