शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे आ.लक्ष्मण पवार यांचं महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

बीड – ऐन रब्बी हंगामातच महावितरण कंपनीने कोणतीच पूर्वसूचना न देताच शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित करायला सुरुवात केली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यांसदर्भात गेवराईचे भाजप आ.लक्ष्मण पवार यांनी महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. वीज पुरवठा सुरळीत केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा पवार यांनी इशारा दिल्यानंतर तहसीलदार व महावितरणच्या उपअभियंत्यांनी घटनास्थळी येऊन वीज सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिले व त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या उपोषणात जि. प. सदस्य पांडुरंग थडके, सभापती दीपक सुरवसे, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, उपाध्यक्ष राजेंद्र राक्षभुवनकर, पं. स. सदस्य जगन आडागळे, नगरसेवक राहुल खंडागळे, अॅड. भगवान घुंबार्डे, भरत गायकवाड, अजित कानगुडे, जानमोहमंद बागवान, समाधान मस्के, भाजप जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब गिरी, करण जाधव, बाळासाहेब गायकवाड, पुरुषोत्तम दाभाडे, शेख बदुयोद्दीन आदी सहभागी होते.

आमदार पवार यांनी ठिय्या आंदोलन सोडणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर तहसीलदार सचिन खाडे व महावितरणच्या उपअभियंत्यांनी तत्काळ कृषी पंपांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही दिली. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही आठ दिवसांत वीजेशी निगडीत सर्व समस्या दूर करण्याचा शब्द दिल्याने हे उपोषण मागे घेतले.

महत्वाच्या बातम्या –