राज्यातील ‘या’ पाच जिल्ह्यात अवकाळीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचे नुकसान

पिकांचे नुकसान

औरंगाबाद – गेल्या आठवड्यात मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे. १६ हजार हेक्टवरील रब्बी पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे माहिती समोर आली आहे. यात फळबागा तसेच बागायती क्षेत्रफळाचा समावेश आहे. नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी लवकरच शासनाकडे अंतिम अहवाल पाठविण्यात येणार आहेत.

गत वर्षीच्या अतिवृष्टीत मराठवाडा विभागातील २६ लाख हेक्टवरील खरीप हंगामाचे नुकसान झालं होतं. त्याकरिता २ हजार ३५० कोटींची मदत शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील ५ तालुक्यांत १३४ गावे, जालन्यातील ३ तालुक्यांतील ४२ गावे, बीडमधील ३ तालुक्यातील ६७ गावे, परभणीत एका तालुक्यातील ३८ गावे आणि उस्मानाबादेत ४ तालुक्यातील ५१ गावे अशा एकूण १५ तालुक्यांतील ३३२ गावांचा समावेश आहे. पाच जिल्ह्यांत ४५ हजार ५३५.६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

यात जिरायती १४ हजार ७० हेक्टर, बागायती ३० हजार ५१० हेक्टर आणि ९५५ हेक्टरातील फळबागांच्या नुकसानीचा समावेश आहे. १६ हजार २५९.६३ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. दरम्यान, दि. १८ आणि १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या पावसाने रब्बी हंगामालाही चांगलाच फटका बसला आहे. नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –