शेतकऱ्यांना शेत मालाची विक्री करण्यासाठी मनपा प्रशासकांनी जागा उपलब्ध करून द्यावी – आ. हरिभाऊ बागडे

हरिभाऊ बागडे

औरंगाबाद – शेतकऱ्यांना शेत मालाची विक्री करण्यासाठी मनपा प्रशासकांनी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी केली आहे. यासाठी जिल्हाधिकारी आणि प्रशासक अशा दोघांनाही निवेदन देण्यात येणार असल्याचेही बागडे यांनी सांगितले.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला. या परिस्थितीत शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करण्याची परवानगी नाही. त्यामुळे मालाला बाजारपेठ नसल्याने व कुणी खरेदी करत नसल्याने आणलेला माल ते रस्त्यावर फेकून देत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार हरिभाऊ बागडे यांनी टोमॅटो, कोबी आदी नाशवंत मालाच्या विक्रीसाठी महापालिका प्रशासकांनी विविध ठिकाणी मनपा हद्दीत मोजक्याच शेतकऱ्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात होणारा कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ११ मार्चपासून जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊन जाहीर केला आहे. यादरम्यान जाधववाडी बाजार समितीत पहाटे भरणारा भाजी-फळांचा बाजार सात दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महत्वाच्या बतम्या –