शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसल्यावर पळे; उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावलं

उद्धव ठाकरे

मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावर चर्चा करण्याचा अखेरचा दिवस आहे. गेले तीन दिवस भाजपने राज्य सरकारवर विविध विषयांवरून हल्लाबोल केला होता. भाजपच्या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

यावेळी त्यांनी दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरून भाजपला लक्ष्य केलं आहे. ‘पंजाब-हरियाणाचे शेतकरी आपल्या मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करण्यासाठी बसले आहेत. त्यांनी राजधानी दिल्लीत प्रवेश करू नये म्हणून अडथळ्यांच्या भिंती उभ्या केल्या गेल्या. रस्त्यात खिळे ठोकले गेले, त्यांचा वीजपुरवठा बंद केला गेला, त्यांच्या सोयीसुविधा बंद केल्या. मात्र दुसरीकडं चीनने आपल्या भूमीवर कब्जा प्रयत्न केला. चीनसमोर हे पळाले. हे म्हणजे, शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसल्यावर पळे,’ असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा होऊ देणार नाही; ठाकरेंनी ठणकावलं

‘माझं आजोळ विदर्भ आहे, त्याला मी विसरलेलो नाही. त्याला माझ्यापासून तोडू नका. विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही,’ असं त्यांनी भाजपला ठणकावून सांगितलं आहे. गेले अनेक वर्षे विदर्भाला वेगळं राज्य करण्याची मागणी ही विदर्भातील काही संघटनांकडून केली जात आहे. याला भाजपच्या काही नेत्यांचा देखील पाठींबा असल्याचं दिसून आलं आहे. दुसरीकडं, महाराष्ट्राला तोडण्यास विदर्भातील काही जनतेचा देखील विरोध असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याच मुद्द्यावरून भाजपला ठणकावलं आहे.

महत्वाच्या बातम्या –