शेतकऱ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – नाना पटोले

नाना पटोले

ठाणे – पाडाळे लघु पाटबंधारे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबादला वाटपाचा शुभारंभ विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रातिनिधीक १० शेतकऱ्यांना श्री.पटोले यांच्याहस्ते धनादेश देण्यात आले. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मुरबाड तालुक्यातील बांदलपाडा येथे आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा सुषमा लोणे, खा. कपिल पाटील, आ. किसन कथोरे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांसह पंचायत समिती सदस्य व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. पटोले म्हणाले, एखाद्या प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर तो प्रकल्प विहीत वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी व्यवस्थेमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. व्यवस्थेत बदल करण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगून श्री.पटोले म्हणाले यामध्ये अपेक्षित बदल झालेतर एकही व्यक्ती त्यांच्या हक्काच्या लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सुविधा निर्माण करण्याबरोबरच हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येईल. तसेच समाजातील सर्व घटकांचा विकास करण्यासाठी जातीनिहाय जनगणनेसाठी आग्रही असल्याचेही त्यांनी सांगितले. मुरबाड तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येतील तसेच पुर्नवसनाचा प्रश्न प्राधान्याने सोडवु असेही श्री.पटोले यांनी सांगितले.

यावेळी खा. कपिल पाटील, आ. किसन कथोरे यांची भाषणे झाली.

महत्वाच्या बातम्या –