राज्यात तूर्तास लॉकडाऊन करण्याबाबत निर्णय झालेला नाही मात्र, सर्व चर्चा या याच दिशेने सुरु – राजेश टोपे

राजेश टोपे

मुंबई – गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. राज्य शासन आणि प्रशासनाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

राज्यात दररोज कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ होत असून अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन व कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. दरम्यान, राज्यात रात्री आठ नंतर जमावबंदी लागू करण्यात आली असून मॉल्स, हॉटेल, चित्रपटगृहे व इतर दुकाने देखील रात्री आठच्या आधीच बंद करण्याचे आदेश राज्य शासनाने लागू केले आहेत.

अशातच, पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू केली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत असल्याने सामान्यांसह उद्योजकांमध्ये काहीशी भीती निर्माण होत आहे. तर, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्याची वाटचाल ही लॉकडाउनच्या दिशेने सुरु असल्याचा इशारा दिला आहे.

‘राज्यात तूर्तास लॉकडाऊन करण्याबाबत निर्णय झालेला नाही. मात्र, सर्व चर्चा या याच दिशेने सुरु आहेत. चर्चा सुरु असल्या तरी लॉकडाऊन लागेलच असं नाही. तरी देखील सरकारला अशा परिस्थितींची तयारी करणे गरजेचे असते,’ असं भाष्य राजेश टोपे यांनी केलं आहे. दरम्यान, लवकरच राज्यातील निर्बंधांबाबत सरकार निर्णय घेऊ शकतं अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत. तर, काही जिल्ह्यांमध्ये देखील स्थानिक प्रशासन कडक निर्बंध लावत आहे.

महत्वाच्या बातम्या –