आता कोरोना लस घेणाऱ्याला मोदी सरकार देणार ५ हजार रुपये!

कोरोना लस

नवी दिल्ली – देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. त्याच अनुषंगाने सरकारने लसीकरणावर भर देण्यात येत आहे. भारतात दररोज सरासरी जवळपास ३१ लाख नागरिकांचे लसीकरण होत आहे. आतापर्यंत देशभरातील ८ कोटी ७० लाख जणांचे लसीकरण झाले आहे. पण लसीकरणाबाबत आजही नागरिकांमध्ये गैरसमज आहेत. यामुळे अधिकाधिक लोकांनी लस घ्यावी म्हणून केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.

याचाच एक भाग म्हणून लसीकरण केंद्रावर नागरिकांना काही भेटवस्तू दिल्या जात आहेत. यानंतर आता मोदी सरकारने देखील कोरोना लसीसकरणासंदर्भात देशपातळीवर एक स्पर्धा सुरू केली आहे. ज्यामध्ये कोरोना लस घेणाऱ्याला केंद्र सरकार पाच हजार रुपये देणार आहे. पण या स्पर्धेसाठी काही नियम आणि अटी आहेत. एका हिंदी वर्तमानपत्राने याबाबत वृत्त प्रकाशित केले आहे.

केंद्र सरकारच्या mygov.in या वेबसाईटवर या कोरोना लसीकरणासाठी राबवल्या जाणाऱ्या या स्पर्धेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या स्पर्धेत ती प्रत्येक व्यक्ती भाग घेऊ शकते, ज्या व्यक्तीने कोरोना लस घेतली आहे. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने कोरोना लस घेतल्यानंतर फक्त एक काम करावं लागणार आहे. कोरोना लस घेताना फोटो काढावा लागेल आणि त्यासोबत लसीकरणाचं महत्त्व सांगणारी एक सुंदर टॅगलाईन द्यावी लागेल.

ज्यामुळे लोकांना प्रेरणा मिळेल. तुम्हाला mygov.in वेबसाइटवरील या लिंकवर लॉग इन करावं लागेल. त्यानंतर तिथे तुम्हाला आवश्यक असलेली सर्व माहिती भरा. तुमचा हा फोटो आणि टॅगलाईन पाठवा. सरकार या सर्व फोटो आणि टॅगलाइनमधून उत्तम असा फोटो आणि टॅगलाइनची निवड करेल. स्पर्धेतून दहा विजेत्यांची निवड केली जाईल. त्यांना पाच हजार रुपये दिले जातील.

महत्वाच्या बातम्या –