एक देश एक रेशन कार्ड आता ‘या’ जिल्ह्यामध्ये उपलब्ध

केसरी कार्डधारक

औरंगाबाद – एक देश एक रेशन कार्ड आता औरंगाबाद जिल्ह्यामध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.  केंद्र शासनाच्या आयएम – पीडीएस योजनेतंर्गत संबंधित रास्तभाव दुकानात आधार प्रमाणिकरण  करुन लाभार्थ्यांला पोर्टेबिलिटीव्दारे देशातील कोणत्याही राज्यातील कोणत्याही स्वस्तधान्य दुकानातून धान्य उचलण्याची सुविधा उपलब्ध आहे. ही सुविधा आता औरंगाबाद जिल्ह्यातही सुरू आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दत्ता भारस्कर यांनी दिली आहे.

ऑगस्ट २०१९ मध्ये 2 Clusters च्या स्वरुपात महाराष्ट्रात, गुजरात, आंध्रप्रदेश व तेलंगणा या चार राज्यामध्ये एक देश एक रेशनकार्डची अंमलबजावणीचे प्रायोगिक स्वरुपात सुरु केली होती. या दोन Clusters पैकी एक Clusters मध्ये महाराष्ट्रासह गुजरात राज्य होते.

जानेवारी २०२० पासून एक देश एक रेशनकार्डची अंमलबजावणी  १२ राज्यामध्ये झाली आहे. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगाणा, आंध्रप्रदेश, केरळ, कर्नाटक, झारखंड, हरीयाणा, त्रिपुरा, गोवामध्ये  करण्यात आली.  डिसेंबर २०२० मध्ये  ३२ राज्य तसेच केंद्र शासित प्रदेशांमध्ये ही योजना सुरु करण्यात आली आहे.

या राज्यातील, केंद्रशासित प्रदेशातील कोणत्याही एनएफएसए कार्डधारक बायोमेट्रिक आधार प्रमाणित करुन कोणत्याही राज्यातून धान्य घेऊ शकतो. या योजनेंतर्गत १५ एप्रिल २०२१ पर्यंत महाराष्ट्रात ६३२० शिधापत्रिकांवरील लाभार्थ्यांची बाहेर राज्यांमध्ये धान्य घेतले आहे. इतर राज्यातील ३५२१ शिधापत्रिकाधारकांनी महाराष्ट्रामध्ये धान्याची उचल केली आहे. राज्यातील रास्तभाव दुकानातून स्थलांतरीत कामगार, ऊसतोड मजूर, आदिवासी इ. स्थलांतरण करणाऱ्या लाभार्थ्यांना त्याच्या स्थलांतरणाच्या ठिकाणी कोणत्याही स्वस्तधान्य दुकानामध्ये त्यांना पाहीजे असलेले धान्य घेण्याची सुविधा पोर्टेबिलिटीव्दारे  ई – पॉस उपकरणांवर उपलब्ध करुन दिली आहे.

याकरीता लाभार्थ्यांना सद्यस्थितीतील शिधापत्रिकांवरील  १२ अंकी क्रमांकाचा वापर करावा लागणार आहे. तसेच आधार प्रमाणिकरणाव्दारे धान्य वितरण करण्यात येत आहे. महाराष्ट्रामध्ये दरमहा ७ लाख शिधापत्रिकांवर जिल्ह्यामध्ये पोट्रेबिलिटीचा वापर करुन धान्य घेता येणार आहे.  एप्रिल२०२० ते मार्च २०२१  या कालावधीत ९४.५६ लाख शिधापत्रिकाधारकांची जिल्ह्यात पोर्टेबिलिटी सुविधाव्दारे अन्नधान्याचा लाभ घेतला आहे.  या योजनेच्या  माहितीकरीता हेल्पलाईन क्रमांक १४४४५ संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –