‘या’ जिल्ह्यात कोरोनाचा कहर: गेल्या २४ तासात ४ हजार ६५३ नवे कोरोना रुग्ण

कोरोना

पुणे – पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थिती बिकट होत आहे. पुणे शहरात आज नव्याने ४ हजार ६५३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता २ लाख ७८ हजार ०९९ इतकी झाली आहे.

शहरातील ३ हजार ३३७ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या २ लाख ३५ हजार ५९७ झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात २० हजार ०७३ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता १५ लाख १९ हजार ७८७ इतकी झाली आहे.

पुणे शहरात आज एकाच दिवसात २० हजार ०७३ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता १५ लाख १९ हजार ७८७ इतकी झाली आहे. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ३९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ५ हजार ३७६ इतकी झाली आहे.

पुण्यातील हा वाढता कोरोनाचा उद्रेक पाहता उद्यापासून पुण्यामध्ये पुढील सात दिवसांसाठी हॉटेल, बार, मॉल, सिनेमागृह पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तर हॉटेलमधून होम डिलेव्हरी सुरु राहणार आहे.

तर पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पीएमपीएमएल पुढील सात दिवसांसाठी बंद असणार आहे. दरम्यान, सर्व धार्मिक स्थळे देखील पुढील सात दिवसांसाठी बंद असणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे सायंकाळी सहा ते सकाळी सहा पर्यंत अत्यावशक सेवा वगळता पूर्णपणे संचारबंदी असणार आहे. तर ९ एप्रिलला पुढील परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राव यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –