कारखान्याने ऊस उत्पादकांची थकविलेली रक्कम आरआरसीप्रमाणे, वेळेप्रसंगी मालमत्तेचा लिलाव करून शेतकऱ्यांचे पैसे द्या

पंकजा मुंडे

बीड – भाजप नेत्या पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या परळीतील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला ऐन महाशिवरात्रीच्या दिवशीच राज्याच्या सहकार आयुक्तांनी मोठा दणका दिला आहे. कारखान्याने ऊस उत्पादकांची थकविलेली रक्कम आरआरसीप्रमाणे, वेळेप्रसंगी मालमत्तेचा लिलाव करून शेतकऱ्यांचे पैसे द्या असे आदेश राज्य सहकार आयुक्तांनी दिल्याने संचालक मंडळाच्या अडचणी वाढल्या आहेत.

पगार थकविल्याने कालच कामगारांनी कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहेत. आधी पगार द्या त्यानंतरच कामे सुरू करू असा आक्रमक पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतल्यानंतर आता वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला पुन्हा सरकारकडून आणखी एक धक्का बसला आहे. कारखान्याने उसउत्पादकांची एफआरपीची रक्कम थकविल्याने कारखान्याला नोटीस देण्यात आली होती.

मात्र, कारखान्याने सदर रक्कम न दिल्याने आता २५ कोटी ७९ लाखाच्या थकबाकीसाठी राज्याचे सहकार आयुक्त शेखर गायकवाड यांनी आरआरसीप्रमाणे वसुलीची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आता ही रक्कम महसुली वसुली म्हणून वसूल करण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहेत. साखर, मोलॅसिस याची विक्री करून आणि गरज पडल्यास कारखान्याच्या इतर मालमत्तांचा लिलाव करून सदर वसुली करावी असे आदेश सहकार आयुक्तांनी दिलेत. यामुळेसाखर कारखान्याचे संचालक मंडळ आता चांगलीच अडचणीत सापडले आहे.

महत्वाच्या बतम्या –