पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या रांगेत आता खाद्यतेलाचाही समावेश, खाद्यतेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढ

तेल

औरंगाबाद – पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या रांगेत आता खाद्यतेलाचाही समावेश झाला आहे. सुर्यफुल तेलाची किंमत दीडशे पार गेली आहे. सुर्यफुल तेलाची सध्याची किंमत १४५ ते १५२ रुपये आहे तर शेंगदाणा तेल १५० ते १५५ रुपये, सोयाबीन तेल १२५ रुपये तर सरकी व पामतेल १२० रुपये प्रतिलिटर झाली आहे.

पहिल्यांदाच खाद्यतेलाच्या किंमती एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. खाद्यतेलाच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने आयात शुल्कात १० टक्क्यांनी कपात केली असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाच्या किमती वाढत असल्यामुळे या कपातीचा काहीच फायदा झाला नाही. एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत असलेल्या पामतेलाच्या किमती तर दुसरीकडे सोयाबीनला आलेली मागणी याचा परिणाम खाद्यतेलांच्या किंमतीवर होत आहे.

या सगळ्याचा परिणाम म्हणजे खाद्यतेलाची विक्री ३० ते ४० टक्क्यांनी घटली आहे. सर्वसामान्य माणूस या महागाईच्या आगीत होरपळून निघत आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती समजून घेतल्या पण आता अत्यावश्यक अशा गॅस व खाद्यतेलाच्याही किंमती वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे.

महत्वाच्या बातम्या –