२९ मार्चपासून कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता

बंद

औरंगाबाद – कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहे.  तर दुसरीकडे काही लोक कोरोनाला अजूनही गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहेत. यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडून सोमवार (दि. 29) पासून कडक लॉकडाऊन लावण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

कोरोना महामारीच्या दुसर्‍या टप्प्यात फेब्रुवारीपासून रूग्णसंख्या खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्येचा रोजचा आकडा दीड हजाराच्या पुढे जात आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शुक्रवारी बोलताना 100 रूग्णात 25 पॉजिटीव्ह येत असल्याचे सांगितले. या संसर्गाचे हे प्रमाण जास्त असल्याचे मान्य देखील केले. यावरून या संसर्गाची गंभीरता दिसून येत आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊन लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही या भुमिकेपर्यंत प्रशासन आले आहे. मात्र त्याबाबत निर्णय घ्यावा, किंवा नाही या मनस्थितीत  प्रशासन दिसत आहे.

दरम्यान गुरूवारी पालकमंत्री सुभाष देसाई यांनीदेखील आरोग्य विभागाने संपूर्ण लॉकडाऊनच्या सूचना दिल्याचे सांगितले. ही परिस्थिती अजुन गंभीर होण्यापुर्वी लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. तसेच आरोग्यमंत्र्यांचे मत घेऊन लॉकडाऊनबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असेही जिल्हाधिकारी या वेळी म्हणाले होते. सध्या जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊन सुरू आहे. 11 मार्चपासून 4 एप्रिल या कालात अंशत: लॉकडाऊन लावले आहे. तर सायंकाळी 8 वाजेपासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. याशिवाय चार एप्रिलपर्यंत प्रत्येक शनिवारी व रविवारी पुर्ण लॉकडाऊन आहे. यामधून वैद्यकीय सेवा, वृत्तपत्र, मिडीया संदर्भातील सेवा, दूध विक्री , पेट्रोल पंप, गॅस एजन्सीशी संबंधित सर्व प्रकाराच्या वाहतूक सेवा या मध्ये खासगी तसेच  शासकीय, रिक्षासह , बांधकामे, उद्योग व कारखाने, बँक व पोस्ट सेवा संदर्भात सुरू ठेवण्यात येत आहेत.

सोमवारपासून लॉकडाऊन ? : शनिवार ते रविवार कडकडीत बंद पाळला जाणार आहे. तर सोमवारी धुलीवंदन आहे. यामुळे सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारपासून चार एप्रिलपर्यंत पुर्ण लॉकडाऊनची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यातुन औद्योगिक क्षेत्र वगळले जाण्याची शक्यता दिसते. संपूर्ण लॉकडाऊनच्या संदर्भात दोन दिवसात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीनंतर या बाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –