पुणे – राज्यातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याने बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात अवकाळी पावसाचे हवामान निर्माण आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वार्तिवला आहे.
काल मंगळवारी (ता.१६) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. राज्यातील इतर सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा १४ अंशांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे राज्यातील थंडीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी झाला असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
गालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या वाऱ्यांबरोबरच होणारा बाष्पाचा पुरवठा, उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह या पोषक स्थितीमुळे राज्यात अवकाळी पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वार्तिवला आहे.
राज्यातील या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस – बुधवार – सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण मराठवाडा व विदर्भगुरुवार – सिंधुदुर्ग, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भशुक्रवार – रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सातारा, औरंगाबाद
महत्वाच्या बातम्या –
- मोठी बातमी – राज्यात कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता
- राज्यातील हवामानात अचानक मोठा बदल; ‘या’ जिल्ह्यांमध्ये होणार वादळी पाऊस
- तुप खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, तुम्हाला माहीत आहेत का?
- ‘हे’ उपाय करून पाठदुखी मिनिटांत दूर करा, माहित करून घ्या
- रात्री झोपताना 2 लवंग खाऊन पाणी पिल्याने होईल हे फायदे, जाणून घ्या