राज्यातील ‘या’ जिल्ह्यात बटाटा ६०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल

बटाटा

औरंगाबाद – औरंगाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (दि. २७ ) बटाट्याची ३५० क्विंटल आवक झाली असून औरंगाबादमध्ये  बटाट्याला ६०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला आहे. बटाट्याचा सरासरी दर ८०० रुपये प्रतिक्विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी (दि. २७ ) द्राक्षाची ७७ क्विंटल आवक झाली आहे. या द्राक्षाला सरासरी ३७५० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला आहे. १३ क्विंटल आवक झालेल्या रामफळाचे सरासरी दर २६०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. टरबुजाची आवक १३० क्विंटल, तर सरासरी दर ६५० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ३७ क्विंटल आवक झालेल्या खरबुजाला सरासरी १२०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे. मोसंबीची आवक ७ क्विंटल, तर सरासरी दर ३७५० रुपये प्रतिक्विंटल राहिला आहे. १२ क्विंटल आवक झालेल्या डाळिंबाला सरासरी ५००० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला आहे. चिकूची आवक २५ क्विंटल, तर सरासरी दर १००० रुपये प्रति क्विंटल राहिले आहे. ५ क्विंटल आवक झालेल्या अंजिराला सरासरी ४००० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –