मुंबई – महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. तिसऱ्या दिवशी भाजप नेते शेतकरी नुकसान भरपाई मुद्यावरुन आक्रमक झालेले पाहायला मिळाले. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे.
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी भाजप नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप आमदार यावेळी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना मदत न करणाऱ्या.. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या ठाकरे सरकारचा निषेध करीत आज @BJP4Maharashtra आमदारांनी विधानभवन पायऱ्यांवर आंदोलन केले! pic.twitter.com/3q9wAZTPeG
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 3, 2021
दरम्यान, आधी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि नंतर संजय राठोड यांचं प्रकरण थांबत नाही तोच आता भाजप महाविकास आघाडीच्या आणखी एका आमदाराच्या प्रकरणाचा पर्दाफाश होणार आहे. आघाडीच्या एका आमदाराच्या डीएनए टेस्टची मागणी आज विधानपरिषदेत करणार असल्याचं विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं. त्यामुळे महाविकास आघाडीचा हा आमदार कोण? याबाबत तर्कवितर्क वर्तवले जात आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- महत्त्वाची बातमी – राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी ‘ही’ आहे अट
- मोठी बातमी – राज्यातील ‘या’ जिल्ह्यात कोरोना सातत्याने वाढत असल्यामुळे ७ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर
- राज्यात लॉकडाऊन होणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही – दत्तात्रय भरणे
- राज्यातील ‘या’ पाच जिल्ह्यात अवकाळीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचे नुकसान
- पोटातील गॅसचा त्रास दूर करण्यासाठी करा हे ‘5’ घरगुती उपाय