बाजारपेठेसह रस्त्यावरून विनामास्क फिरणार्‍या नागरिकांना प्रशासन करणार क्वॉरंटाईन

परभणी –  बाजारपेठेसह रस्त्यावरून विनामास्क फिरणार्‍या व्यक्तींना यापुढे दंडात्मक कारवाईस सामोरे जाण्याबरोबरच एक दिवस रेणूका मंगल कार्यालयात कोरंटाईन करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सोमवारी  दिला आहे.

जिल्ह्यात काही दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करणे सुरु आहे. तसेच मास्क वापर करणेबाबात नागरिकांना वारंवार सूचना देण्यात येत आहेत. परंतु नागरिकांकडून  अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे कठोर अंमलबजावणी करावी लागणार असल्याने मंगळवारपासून  विनामास्क फिरणार्‍या नागरिकांविरूध्द दंडात्मक कारवाईबरोबरच त्या व्यक्तीस ताब्यात घेऊन रेणूका मंगल कार्यलयातील कॉरंटाईन केंद्रात एक दिवस कॉरंटाईन ठेवण्यात येणार आहे. 

तसेच पकडलेल्या सर्व नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. यास विरोध करणारांविरूध्द कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा पोलिस अधीक्षकांसह आयुक्त यांच्यावर असणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे. नागरिकांनी या बाबत काळजी घ्यावी अन्यथा या कठोर आणि दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. 

महत्वाच्या बातम्या –