‘राहुल गांधी शेतकऱ्यांचे शोषण करत आहेत’

स्मृति इराणी

नवी दिल्ली – देशात नव्या कृषी कायद्यांवरून ऐन थंडीत वातावरण तापलं आहे. गेले २९ दिवस दिल्लीतील सीमांवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. यावरून गेल्या महिना भरापासून राजकारण देखील तापले आहे. तर वेळोवेळी सरकार आणि शेतकऱ्यांमधील चर्चा निष्फळ होत आहे.

दुसरीकडे, या कायद्यांच्या समर्थकांची देखील संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने आज शेतकरी सानावाद काराक्रमच आयोजन केल आहे. यावेळी केंद्रीय मंत्री आणि अमेठीच्या खासदार स्मृति इराणी यांनी राहुल गांधी यांना आव्हान दिले आहे. की, राहुल गांधींनी सांगावे की, त्यांनी अमेठीच्या शेतकऱ्यांचे शोषण का केले ?

स्मृति इराणी यांनी म्हटले कि, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आपल्या खात्यामध्ये अनुदान हवे आहे. जे आता भाजप सरकार च्या काळात शक्य झाल आहे. तर योगी सरकार देखील शेतकऱ्यांच्या हिताचे काम करत आहे. त्या तुलनेत यूपीए च्या कार्यकाळात शेतकऱ्यांना अनुदान दिले गेले का ? असा सवाल त्यांनी यावेळी राहुल यांना केला आहे.

महत्वाच्या बातम्या –