राज्यातील कोरोना बाबत राजेश टोपेंनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

राजेश टोपे

मुंबई – महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आठ दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार आहे.

राज्यात आज आठ हजार ३३३ कोरोना बाधितांची वाढ झाली आहे. तर, काल पेक्षा आज अधिक रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दिवसांभारात ४९३६ कोरोना बाधित रुग्ण हे बरे झाले आहेत. दरम्यान, एकूण २० लाख १७ हजार ३०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या काही दिवसांमध्ये रोज आठ हजारांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात येत आहे.

दरम्यान, राज्यात सद्या एकूण ६७ हजार ६०८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.35% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाला वेळीच आवरण्यासाठी केंद्रानं उच्चस्तरीय समिती तयार केली आहे. ही समिती राज्यातील कोरोना नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

महत्वाच्या बातम्या –