राज्यात कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे राजेश टोपेंनी दिलाय लॉकडाऊनचा इशारा

आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई – कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चाललेला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तरी देखील अनेक नागरिक कोरोनाच्या नियमनाचे पालन करताना दिसत नाही. लोकांना गांभीर्य नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

राज्यात आज 24645 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 19463 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2234330 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 215241 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.22 % झाले आहे.

महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महत्वाचं भाष्य केलं आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे चिंता वाढत आहे. उद्या याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईल. काही दिवस दिले जातील.

लगेच उद्या लॉडकडाऊन जाहीर होणार नाही, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन टाळायचं असेल तर जनतेनं नियम पाळायला हवे, असं आवाहनही टोपे यांनी नागरिकांना केलंय. अजून 2-4 दिवस कोरोना रुग्ण वाढण्याचा अंदाज आहे. त्यानंतर हे प्रमाण कमी होईल, असा अंदाज असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या –