राज्यातील हवामानात झपाट्याने बदल; राज्यातील ‘या’ भागात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरूवात

पाऊस

नागपूर –  शहर आणि परिसरात सकाळपासूनच काळ्या घनदाट ढगांनी गर्दी केली असून भागात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यासह विदर्भात पावसाचा इशारा दिला होता.  नागपूरमध्ये आज सकाळपासून काळ्या ढगांची दाटी दिसून आली आहे असे हवामान खात्याने सांगितले. नागपूर जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

नागपूरच्या  दत्तवाडी, हिंगणा, गोंडखैरी या भागात सकाळपासूनच जोरदार वारा सुरू असून ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू असं हवामान खात्याने म्हटलं आहे. सध्या पाऊस हलक्या स्वरूपात पडत आहे. मात्र ढगांमुळे संपूर्ण परिसरात काळाकुट काळोख पसरला आहे. हवामान विभागाने आधीच नागपूर सह पूर्व विदर्भात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.

आज नागपूरात पावसाला सुरूवात झाली आहे. येत्या पुढील तीन दिवसांतमध्य महाराष्ट्रात नाशिक, जळगाव आणि पुणे जिल्ह््यांत काही ठिकाणी, मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी आणि बीड जिल्ह््यांत, विदर्भात नागपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह््यांत पावसाचा अंदाज आहे, असंही हवामान खात्याने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –