कोरोना

मागील काही दिवसापासून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा नव्याने वाढत असल्यामुळे ‘या’ जिल्ह्यात ७ मार्चपर्यंत निर्बंध

परभणी – मागील काही दिवसापासून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा नव्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमिवर शहर तसेच जिल्ह्यात येत्या ७ मार्चपर्यंत जिल्हाधिऱ्यांनी एक आदेश जाहीर करत निर्बंध लादले आहेत. या आदेशानुसार ७ मार्च पर्यंत जिल्यात कोणत्याही प्रकारचे आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. धार्मिक स्थळामध्ये दैनंदीन विधी पार पाडण्यास पाच व्यक्तिना परवानगी देण्यात आली आहे. तसेच विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, अकोला. वाशिम, बुलढाणा, भंडारा, गोदींया, वर्धा या जिल्ह्यातुन परभणी जिल्ह्यात येणाऱ्या खासगी व सार्वजनिक प्रवासी वाहतूकीस ७ मार्च पर्यंत प्रतिंबध केला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी एका आदेशाद्वारे विविध पक्ष, संघटनांच्या मोर्चे, निदर्शने, रास्ता रोको, उपोषणे व अन्य सर्व प्रकारच्या आंदोलनांवर ७ मार्चपर्यंत निर्बंध घातले आहेत. जिल्ह्यात शनिवारी ७० नवे रुग्ण समोर आले आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या ८ हजार ५१८ असुन ७ हजार ९७२ रुग्ण हे कोरोनामु्क्त झाले आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या २२२ इतकी आहे

महत्वाच्या बातम्या –