‘या’ जिल्ह्याच्या रस्त्यांच्या कामांसाठी 8 कोटी रूपये मंजूर; शेतकऱ्यांना सातत्याने भेडसावणारा चिखल – मातीचा त्रास कायमस्वरूपी हद्दपार होणार

बच्चू कडू

मुंबई – अमरावती जिल्हातील अचलपूर विधानसभा मतदारसंघातील पांदण रस्ते आता कात टाकणार आहेत. राज्याच्या नियोजन विभागाने पांदण रस्त्यांच्या कामांसाठी 8 कोटी रूपये मंजूर केले असून शेतकऱ्यांना सातत्याने भेडसावणारा चिखल – मातीचा त्रास कायमस्वरूपी हद्दपार होणार आहे.

अचलपूर उपविभागातील शेतात जाणाऱ्या पांदण रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे.निधी अभावी रस्तेच होत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी राज्याच्या नियोजन विभागाच्या सातत्याने लक्षात आणून दिली. इतकेच नव्हे तर खराब पांदण रस्त्यांमुळे शेतकऱ्यांचे कसे नुकसान होत आहे हे पटवून देण्यात ते यशस्वी ठरले.अखेर नियैजन विभागाने अचलपूर उपविभागातील पांदण रस्त्यांची कामे करण्यासाठी सुमारे 8 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला.पालकमंत्री पांदण रस्ते योजनेंतर्गत ही कामे केली जाणार आहेत.एखाद्या उपविभागात एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात पांदण रस्त्यांची कामे होण्याचा हा राज्याच्या इतिहासातील पहिलाच प्रसंग आहे. ज्यांच्यासाठी बच्चू कडू यांनी हा निधी खेचून आणला तो शेतकरी वर्ग मात्र चांगलाच सुखावला आहे.अमरावती जिल्ह्यासह जालना,औरंगाबाद,परभणी,हिंगोली,नांदेड आणि वर्धा जिल्ह्याला देखील हा निधी विशेष बाब म्हणून मंजूर झाला आहे.

महत्वाच्या बातम्या –