शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा हेतूने समरजितसिंह घाटगे उपोषणास बसणार

समरजितसिंह घाटगे

कागल – कागलच्या शाहू ग्रुपचे अध्यक्ष, राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे यांनी जाहीर केल्याप्रमाणे ते बुधवार ता.२४ रोजी सकाळी येथील ऐतिहासिक दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे चरणी उपोषणास बसणार आहेत.

सर्वसामान्य माणूस व शेतकरी यांना केंद्रस्थानी ठेवून शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा हेतूने हे लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे.

या दिवशी सकाळी करवीर निवासिनी श्री. अंबाबाईचे दर्शन घेऊन शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य नागरिकांचे हे प्रश्न सोडविण्याची या सरकारला सुबुद्धी दे !असे साकडे घालून व राजर्पि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून या उपोषणाला ते सुरुवात करणार आहेत.

लॉकडाऊन काळातील विज बिल माफ करणे,प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहनात्मक अनुदान ,दोन लाखाच्या वरील कर्जमाफी, शेती पंपाच्या बिल  माफीवावत स्पष्टता व अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मदत या शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

त्यांच्या या भूमिकेसाठी जिल्ह्यातून विविध संस्था संघटना यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. राजघराण्यातील व्यक्ती जनतेच्या मागण्यासाठी उपोषणास बसण्याची ही पहिलीच वेळ आहे.त्यामुळे त्यांच्या या उपोषणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

महत्वाच्या बातम्या –