संयुक्त किसान मोर्चाने २६ मार्च रोजी भारत बंदची हाक दिली असून या भारत बंदला आता राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा

संचारबंदी

मुंबई – संयुक्त किसान मोर्चाने दिनांक २६ मार्च रोजी भारत बंदची हाक दिली असून या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

केंद्रसरकारच्या काळ्या कृषी कायद्याविरोधात गेल्या १०० दिवसापेक्षा जास्त दिवस देशातील शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. यामध्ये आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. शिवाय गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. यामुळेच शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे आणि या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला आहे.

दरम्यान,या बंद ला केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर कॉंग्रेसने देखील पाठींबा दिला आहे. या देशव्यापी संपाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा सक्रिय पाठींबा असून यादिवशी राज्यभर उपोषण आंदोलन केले जाणार आहे अशी माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

दरम्यान,कर्नाटकच्या शिमोगा येथे महापंचायतीनंतर संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी रविवारी अनेक ठिकाणी शेतकरी नेत्यांसमवेत बैठक घेतली. दक्षिण भारतात ही चळवळ अधिक तीव्र करण्यासाठी एक रणनीती आखली गेली. या बैठकीत मंडी यंत्रणेच्या बळकटीकरणावर चर्चा झाली.

महत्वाच्या बातम्या –