एसबीआयच्या ग्राहकांना मिळणार आता घरबसल्या ‘या’ सुविधा, जाणून घ्या

मुंबई – कोरोना नंतर ग्राहकांना घरबसल्या बँकिंग सुविधा मिळण्यासाठी बँकांकडून अनेक नवनवीन योजना आणण्यात आल्या तर ऑनलाईन बँकिंग वापराचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या पार्श्वभूमीवर आता देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने त्यांच्या 42 कोटी ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलं आहे.

ग्राहक आता घर बसल्या हँकेत्या 9 सेवांचा लाभ घेता येणार आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, एसबीआय योनो मोबाईल अॅपद्वारे डोरस्टेप बँकिंग सेवा सुरू करत आहेत. वेब पोर्टल आणि कॉल सेंटर या मोबाईल अ;ॅपद्वारे या सुविधांचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे

डोअरस्टेप बँकिंगचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना नोंदणी करावी लागणार आहे. सगळ्यात आधी चेक, डिमांड ड्राफ्ट, वेतन ऑर्डर इत्यादी, फॉर्म 15G/15H , IT/GST चालन, अकाउंट स्टेटमेंट, मुदत ठेव पावती जमा करणं इत्यादी सुविधा यामाध्यमातून देण्यात आल्या आहेत. इतकंच नाही तर आता बँकेने आर्थिक सेवादेखील सुरू केल्या आहेत. यामध्ये PSBs चे ग्राहक कुठल्याही शुल्काशिवाय या सुविधांचा लाऊ घेऊ शकतात.

त्याचबरोबर कामकाजाच्या दिवशी, टोल फ्री क्रमांक 1800 1037 188 किंवा 1800 1213 721 वर सकाळी 9 ते संध्याकाळी 4 दरम्यान कॉल करता नेणार आहे. एसबीआय डोअरस्टेप बँकिंग सेवांविषयी अधिक माहितीसाठी, ग्राहक https://bank.sbi/dsb वर भेट देऊ शकतात. ग्राहक त्यांच्या गृह शाखेशी संपर्क साधू शकतात.

या ९ सुविधांमध्ये नकदी प्राप्ति (कॅश पिकअप),रोख वितरण (कॅश डिलिव्हरी), चेक मिळवणे (पिकअप), मागणी स्लिप तपासणे, फार्म 15H पिकअप, ड्राफ्ट वितरण, मुदत ठेव माहिती (सल्ला) आणि वितरण, जीवन प्रमाणपत्र पिकअप करणे, केआयसी कागदपत्रांची निवड, या सेवेचा कोण घेऊ शकतं फायदा, एसबीआयच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, नेत्रहीन व्यक्ती आणि अपंग या सुविधेचा फायदा घेऊ शकतात. इतकंच नाहीतर 70 वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिकही या सेवेचा लाभ घेऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या –