नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे आभार मानण्याचा प्रस्तावावर राज्यसभेत आज चर्चा होत आहे. त्याच, पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाषण केल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तरानंतर केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्यांसंदर्भातील पुढील भूमिका स्पष्ट झाली आहे.
दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, आंदोलनातील वयोवद्धांना पाहून आम्हाला आनंद होत नाही अस पंतप्रधान म्हणाले आहेत. तर एकदा संधी देऊन पाहा, या सुधारणेमुळे फायदा होईल की नाही. त्यानंतरही आपण सुधारणा करु शकू असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. आंदोलनावर चर्चा होतच राहिल, पण आंदोलन मागे घ्यावे, असे मोदींनी म्हटलं आहे.
या सगळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्या भूमिकेवर देखील भाष्य केले आहे. मी सुधारणेसाठी तयार असल्याचं शरद पवारांनी सांगितलंय. शरद पवार यांनी कृषी कायद्यांच्या सुधारणेला विरोध केला नाही अस मोदी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- शेतकऱ्यांना नवीन वीज जोडणी तसेच थकबाकीदार शेतकऱ्यांना थकबाकी मुक्त करण्यासाठी सवलत मिळणार
- संपूर्ण देशात कृषी कायदा लागू करण्यापूर्वी केंद्र सरकारने एकदा राज्यांशी बोलायला हवे होते – शरद पवार
- शेतकऱ्यांशी चर्चा करणारे रेल्वे मंत्री पियुष गोयल काही कृषि तज्ज्ञ नाहीत – शरद पवार
- ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांने उगवली महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी; स्ट्रॉबेरी उत्पादनातून त्यांना ८० हजारचे मिळाले उत्पादन