धक्कादायक! राज्यात कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात मोठी भर; काल दिवसभरात आढळले ‘एवढे’ रुग्ण

कोरोना

मुंबई – महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक उपाययोजना राज्यभरात राबवल्या जात आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे लसीकरण देखील सुरु आहे. मात्र महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बुधवारी दिवसभरात २० हजारांहून अधिक नव्या रुग्णांची भर पडल्यामुळे राज्याच्या चिंतेत भर पडली आहे. आज दिवसभरात २३ हजार १७९ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर ९ हजार १३८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, आतापर्यंत एकूण २१ लाख ६३ हजार ३९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

एकाच दिवशी २० हजारांहून अधिक रुग्णांची वाढ झाल्यामुळे राज्यातील सध्याचा ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा १ लाख ५२ हजार ७६० पार गेला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन कोरोनाला प्रतिबंध घालण्याबाबत मार्गदर्शन केलं आहे. यावेळी त्यांनी लसीकरणाबाबत देखील राज्यांना विविध सूचना केल्या आहेत.

महाराष्ट्रातील रुग्ण संख्या झपाटयाने वाढतेय, राज्य सरकारने केंद्राकडे केली विशेष मागणी !

महाराष्ट्रातील रुग्णवाढ ही चिंतादायक आहे. त्यामुळेच राज्य सरकारतर्फे केंद्राकडे एक महत्वाची मागणी करण्यात आली आहे. ज्यांना दुर्धर आजार आहे, अशा ४५ ते ६० वर्षे वयोगटातील नागरिकांना लस दिली जात आहे. मात्र, वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ४५ वर्षांपुढील सर्व नागरिकांना लस घेण्याची परवानगी देण्यात यावी, असा प्रस्ताव महाराष्ट्र सरकार तर्फे केंद्र सरकारला देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या –