धक्कादायक! राज्यात काल कोरोना रुग्णांचा आकडा दहा हजारांपार

कोरोना

मुंबई : कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून भारतात सर्व काही पूर्ववत होत आहे. पण काही जण कोरोना संदर्भातील नियम पाळत नसल्यामुळे आता कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

राज्यात काल  १०२१६ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व  नवीन ६४६७ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण २०५५९५१ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ८८८३८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९३.५२% झाले आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आठ दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाला वेळीच आवरण्यासाठी केंद्रानं उच्चस्तरीय समिती तयार केली आहे. ही समिती राज्यातील कोरोना नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

महत्वाच्या बातम्या –