रेशीम शेतीला कृषी पिकाप्रमाणे दर्जा देण्यात यावा – राजेंद्र पाटील

अपारंपरिक रेशीम उत्पादनात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असून राज्यात तुती व टसर रेशीम उत्पादन केले जाते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी हा उद्योग महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो असे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यांनी सांगतले आहे. भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया येथे टसर रेशीम कोष बाजारपेठची उभारणी करण्यात येणार आहे.

स्ट्रॉबेरी या फळांवर अधिक संशोधन करण्याची गरज – उद्धव ठाकरे

रेशीम शेतीला कृषी पिकाचा दर्जा देतानाच पीक विम्याच्या यादीत त्याचा समावेश करण्याबाबत कृषीमंत्री दादा भुसे यांच्यासोबत चर्चा करण्यात येईल, असे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले. मंत्रालयात रेशीम संचालनालयाचा आढावा राज्यमंत्र्यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते. राज्यात गेल्या काही वर्षात रेशीमच्या उत्पन्नात दुपटीने वाढ झाली असून तुती लागवड क्षेत्र सुमारे १७ हजार ८१५ एकर क्षेत्र एवढे आहे. सुमारे १६ हजार ६७५ शेतकरी रेशीम शेती करत असून सुमारे २१ लाख लोकांना त्याद्वारे रोजगार निर्मिती झाली आहे.

‘व्हॅलेंटाइन डे’करिता गुलाब परदेशात जाण्यासाठी सज्ज

या रेशीम शेतीला कृषी पिकाप्रमाणे दर्जा देण्यात यावा. त्याचबरोबर पीक विम्याच्या यादीमध्ये त्याचा समावेश व्हावा, जेणेकरुन अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना देखील मिळू शकेल. या संदर्भात कृषीमंत्री भुसे यांच्यासमवेत संयुक्त बैठक घेण्यात येईल, असेही राज्यमंत्री पाटील यांनी सांगितले.