लातूर – कोरोना कहर दाखवत असताना त्याला नमवण्यासाठी लातूरकर सरसावले असल्याचे दिसून येत आहे. मनात कुठलीही शंका न बाळगता आपल्या आरोग्यासाठी लातूरकरांनी मोठ्या उत्साहात कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचवून घेतली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३५ केंद्रांवर एकूण ९८ हजार ३४४ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये ८६ हजार ८७१ नागरिकांना लसीचा पहिला, तर ११ हजार ४७३ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
कोविशिल्ड’चे लसीकरण १६ जानेवारीपासून आरोग्य सेवेशी निगडीत सर्व डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांना व त्यानंतरच्या काही दिवसांनी कोरोनाच्या काळात फ्रन्टलाईनवर सेवा बजावणाऱ्या पोलीस, होमगार्ड, घरोघर जाऊन नागरिकांच्या आरोग्य तपासणी व चौकशी करणाऱ्या आशाताई, आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता सेवा देणारे सफाई कामगार अशा योद्ध्यांना लसीकरण करण्यास सुरुवात झाली.
कोरोना महामारीच्या विषाणूपासून सुरक्षित राहण्यासाठी शरिरात प्रतिकार क्षमता वाढविणाऱ्या सिरम इ्स्टिटट्यूटची ‘कोविशिल्ड’ लस १५ जानेवारी २०२१ पासून, तर भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लस १५ मार्च २०२१ पासून जिल्ह्यात दाखल झाली. दोन्ही लसी दाखल झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून लसीकरणाला प्रारंभ झाला.
महत्वाच्या बातम्या –
- मोठी बातमी – उद्धव ठाकरे यांनी महारष्ट्रातील प्रशासनाला लॉकडाऊनच्या तयारीला लागण्याचे दिले आदेश
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ होत असल्यामुळे आता ‘हे’ निर्बंध लागू होणार
- आता ५०० रुपयांत होणार आरटीपीसीआर चाचणी – राजेश टोपे
- २९ मार्चपासून कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता
- मोठी बातमी – ‘या’ जिल्ह्यात ३० मार्चपासून ते 8 एप्रिलपर्यंत संपूर्ण लाॅकडाऊन