वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार

सोनिया गांधी

मुंबई – राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत असून परिस्थिती आणखी बिकट बनत चालली आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी आज काही मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत काँग्रेस शासित राज्यातील सर्व मुख्यमंत्री सामिल होणार आहेत.महाराष्ट्र, ओडिशा, आंध्रप्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, बिहारसहीत अनेक राज्यांमध्ये कोरोना व्हॅक्सीनची कमतरता आहे. त्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लसीचा पुरवठा करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज सोनिया गांधी यांनी ही बैठक बोलावली असल्याने त्या मुख्यमंत्र्यांशी काय संवाद साधणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, राज्यात अंशतः आणि आठवड्याच्या अखेरीस कडक निर्बंध लावूनसुद्धा रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आणखी कडक निर्बंध लावण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक देखील बोलावली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण दिले आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध हाच पर्याय सरकारकडे आहे. मात्र त्याबाबत विरोधी पक्षांची भूमिका जाणून घेतली जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तीन आठवड्यांच्या कडक निर्बंधांचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे मुंबईच्या उपनगरी रेल्वेगाड्यांमधील गर्दी कमी करणंही आवश्यक असून त्यावर बंधन आणावी लागतील असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –