बुलढाण्यातील ५९ हजार शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी विशेष मोहिम

पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यात पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी एक पत्रच निर्गमीत केले असून आगामी १५ दिवसांच्या काळात ग्रामपातळीवर विशेष मोहिम राबविण्याबाबत निर्देशीत केले आहे. जिल्ह्यात तीन लाख ६० हजार शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत. मात्र त्यापैकी ५९ हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालेले नाही. त्यादृष्टीकोनातून ही मोहिम राबविण्यात येत आहे.

आदिवासी बांधवाना वेळेत आरोग्य सुविधा पुरविणार – डॉ.परिणय फुके

पीक कर्ज वाटपाचा टक्का अलिकडील काळात घसला आहे. २०१७-१८ मध्ये तो अवघा २६.१३ टक्क्यांच्या आसपास होता. त्या पार्श्वभूमीवर किसान क्रेडीट कार्ड धारक असलेल्या परंतू बँकांपर्यंत न पोहोचलेल्या किंवा पीक कर्ज उपलब्ध होऊन शकलेल्या शेतकऱ्यांसाठी ही मोहिम राबविण्यात येत आहे.

इंटरनेट जोडणीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त

केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या निर्देशानुसारच ही मोहिम राबविण्यात येत असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेतील सुत्रांनी स्पष्ट केले आहे. बुलडाणा जिल्ह्यात एक हजार ८७७ कोटी रुपयांचे खरीप व रब्बी पीक कर्जाचे उदिष्ठ २०१८-१९ मध्ये होते. मात्र प्रत्यक्षात ६१० कोटी ६३ लाख ३८ हजार रुपयेच अर्थात ३२.५३ टक्केच आहे.