ढगाळ हवामानामुळे वाढलेल्या रोगराईपासून बचाव करण्यासाठी गव्हावर औषधे फवारणी सुरू

यंदा अतिपावसामुळे शेतात उशिरापर्यंत ओलावा टिकून होता. त्यामुळे अनेक ठिकाणी गव्हाची पेरणी उशिरा झाली आहे. ढगाळ हवामानामुळे वाढलेल्या रोगराईपासून बचाव करण्यासाठी अनेक ठिकाणी गव्हावर औषधे फवारणी सुरू आहे. शेतकऱ्यांनी हरभरा कमी प्रमाणात लावलेला दिसून येत आहे. पूर्व भागात पिकांना पाणी देण्यासाठी शेततळी, विहिरी खोदून पाण्याचा साठा केलेला दिसत आहे. शेतकऱ्यांनी नदीवरून थेट पाइपलाइन टाकून पाणी आणले आहे. हे पाणी शेततळ्यात अथवा विहिरीत साठवून ठेवले जाते व योग्यवेळी पिकांना दिले जात आहे.

प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात , अटक मात्र नाही

सध्याच्या वातावरणातील बदलाचा विपरित परिणाम पिकांवर होत असल्याने व रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने महागडी औषधे फवारणी करावी लागत असल्याने भांडवली खर्चात वाढ होत आहे. तसेच शेतकरी भाजीपाला लागवड, कांदे लागवड, द्राक्षे खुडणी, पिकांवर फवारणी, पाणी देणे या कामात व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही ठिकाणी भाजीपाल्याची लागवड सुरू झाली आहे. टमाटे, कोथिंबीर लागवड करून साधारण तीन आठवडे झाल्याने युरिया खत देऊन पाणी भरणे सुरू आहे.

रायगड जिल्ह्यातील जलसंधारण प्रकल्पांना गती देणार – दत्तात्रय भरणे

काही ठिकाणी पूर्ण वाढ झालेली कोथिंबीर उपटून, जुड्या बांधून मार्केटला नेतात. सध्या सुमारे ७०० रुपये शेकडा कोथिंबीर व्यापारी खरेदी करतात. काही ठिकाणी भेंडी, वाल, घेवडा या पालेभाज्या काढून मार्केटला पाठविल्या जात आहे. त्याबरोबरच कोबी, फ्लॉवर या भाज्याही काढून बाजारात नेल्या जातात, मात्र सध्या वाटाणा, गाजर व इतर पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने कोबी, फ्लॉवरच्या भावात घट झाली आहे.