राज्यातील परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन? जाणून घ्या

महाविद्यालय

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा  १६ मार्चपासून घेण्यात येत आहेत. या परीक्षेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन यापैकी एक पर्याय सोमवारपर्यंत विद्यापीठाला कळवण्याचे आवाहन परीक्षा विभागाने केले आहे. पदवी अभ्यासक्रमातील द्वितीय व तृतीय वर्षांची परीक्षा १६ मार्च पसून तर प्रथम वर्षांची परीक्षा एप्रिलमध्ये होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ऑक्टोबर, नोव्हेबर २०२० च्या मार्च, एप्रिल २०२१ मध्ये होणाऱ्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा १६ मार्च २०२१ पासून होणार आहेत. परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून होणार आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या bamua.digitaluniversity.ac संकेतस्थळावर ई – सुविधा एमकेसीएलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन व ऑफलाईन या पैकी कोणत्या पद्धतीने परीक्षा देणार आहेत. या पर्यायांची विद्यार्थ्यांनी निवडीची नोंद करायची आहे. या करिता विद्यार्थ्यांनी bamua.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर जाऊन Click here for BAMUA University Portal हा पर्याय निवडावा त्यानंतर Login here या बटनाचा पर्याय वापरुन Login Type हे Student ने निवडावे व आपला PRN कायम नोंदणी क्रमांक आणि आपला पासवर्ड टाकुन लॉगीन करावे. आपल्या लॉगीनच्या मुख्य पानावरील डाव्या बाजूस असलेल्या Willingness to appear in Exam या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांनी परीक्षा अर्ज भरलेल्या अभ्यासक्रमाचे नावे दिसतील.

अभ्यासक्रमाच्या नावासमोर Apply या लिंकवर Online or offline हा पर्याय निवडावा व पुढील माहितीसह आपला अर्ज जमा करावा. एकदा निवडलेला पर्याय बदलता येणार नाही याची नोंद घ्यावी, तसे विद्यार्थ्यांना कळवावे. पर्याय भरुन झाल्यावर विद्यार्थी आपला अर्ज डाऊनलोड करुन ठेवू शकतात. जे विद्यार्थी हा पर्याय भरणार नाहीत अशा विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन offline पद्धतीने होईल. याची नोंद घ्यावी.विद्यार्थ्यांना पर्याय निवडतेवळी जो मोबाईल नंबर दिला आहे. तोच मोबाईन नंबर Willingness to appear in Exam भरतेवेळेस वापरणे बंधनकारक आहे. परीक्षेच्या वेळी मोबाईल नंबर बदलता येणार नाही, असे केल्यास परीक्षा देता येणार नाही. यामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्यास त्यांची सर्व जबाबदारी ही संबंधित विद्यार्थ्यांची राहील. सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व संबंधितांनी सदर बाब विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी, विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक पाहूनच पर्याय निवडून माहिती अचूक भरावी, असे डॉ. योगेश पाटील यांनी महाराष्ट्र देशाशी बोलताना सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या –