वीज बिल वसुलीमध्ये अडथळा आणत असेल तर त्यांच्यावर कडक करवाई केली जाईल – नितीन राऊत यांचा इशारा

नितीन राऊत

मुंबई – कोरोना काळात आर्थिक गणिते बिघडली असल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण आहेत. यातच महावितरणने भरमसाठ बिले पाठवल्याने गोरगरिबांची अवस्था बिकट बनली आहे. वीज बिलांबाबत सरकारने शेतकऱ्यांचा छळ सुरू केला आहे असा आरोप केला जात आहेत.

लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारने ३०० युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. परंतु ऊर्जामंत्र्यांनी केलेली ही घोषणा केराच्या टोपलीत गेली आहे. आता वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. या सक्तीच्या वसुलीमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे.

जग लॉक डाऊन झालेलं असताना बळीराजाने अश्या परिस्थितीतही जीवाची पर्वा न करता शेतातलं पीक पोसून सर्वांचं पोट भरायचं काम केलं.त्यावेळी ही संचारबंदी असल्याने हा शेतमाल विकायचा कसा..? असा प्रश्न असल्याने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना कवडी किमतीत माल विक्री केला तर काही शेतकऱ्यांवर माल बांधावर फेकण्याची वेळ आली. नेत्यांसह सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी देखील वीजबिल वसुलीला विरोध करत आहेत.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला कोणी कायदा हातात घेऊन वीज बिल वसुलीमध्ये अडथळा आणत असेल तर त्यांच्यावर कडक करवाई केली जाईल अशा इशारा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिला आहे. थकबाकीमुळे महावितरण कंपनी आर्थिक संकटात सापडली असून ग्राहकांनी वीज बिल भरून या कंपनीला संकटातून बाहेर काढावे असे आवाहन नितीन राऊत यांनी केले आहे.

ग्राहकांनी वीज बिल भरण्यास विरोध करण्याएवजी सरकारने जाहीर केलेल्या सवलतीचा लाभ घेऊन थकबाकी भरावी असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगावचे अधिक्षक अभियंता शेख यांच्यासोबत केलेल्या गैरवर्तनाचा ऊर्जामंत्र्यांनी निषेध केला आहे.भाजपच्या सत्ताकाळातील गैरव्यवस्थापनामुळे आज महावितरणवर थकबाकीचा डोंगर उभा राहिला आहे, अशी टीकाही डॉ. राऊत यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या –