कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी ‘या’ जिल्ह्यात आजपासून कडक लॉकडाऊन

बंद

नागपूर – कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी नागपुरात आजपासून आठवडाभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. आज सकाळपासूनच पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. तब्बल 100 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.

स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार रस्त्यावर उतरून नागरिकांना आवाहन करीत आहेत. सध्या तरी पोलीस लोकांवर सक्ती करी नसून समजावून सांगत आहेत. ओळख पत्र पाहून लोकांना सोडले जात आहे. विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई केली जात आहे. वस्त्यांमध्ये सुद्धा पोलीस गाड्यानी फिरून नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करीत आहेत.

नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी १५ मार्च ते २१ मार्च दरम्यान नागपूर शहरात कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. पोलिसांना शहरात कडक संचारबंदी लागू करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असून दारूचे दुकाने आणि हॉटेल पूर्णपणे बंद राहणार असून, दारू आणि जेवण यांची ऑनलाई विक्री सुरु राहणार आहे. तर २१ तारखेला कोरोनाची स्थिती पाहून पुढचा निर्णय घेण्यात येईल अस नितीन राऊत यांनी सांगितले आहे.

दरम्यान, नागपूर शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तर होम क्वारंटाइन असणाऱ्यांनी बाहेर न पडण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. दुसरीकडे खासगी कार्यालये पूर्णपणे बंद असणार असून सरकारी कार्यालयात २५ टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. तर, आर्थिक वर्षाचा शेवट असल्याने त्या कामासंदर्भात असणाऱ्या खासगी, शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पळून कार्यालय सुरु ठेवण्यास मुभा दिली आहे. कोरोना लसीकरण मात्र सुरळीत सुरु राहणार असून लसीकरणासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या वाहतुकीची व्यवस्था त्या भागातील नगरसेवकांनी करण्याची सूचना पालकमंत्री नितीन राऊत यांनी केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –