राज्यातील ‘या’ जिल्ह्यातही कडक निर्बंध; ३१ मार्चपर्यंत शाळा बंद

संचारबंदी

नाशिक – नाशिक शहरात कोरोना पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, नियम न पाळणाऱ्यांवर आता पालिकेकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसंच सर्व शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. १० वी,१२ वी मात्र पालकांच्या संमतीने ऐच्छिक सुरू राहणार असल्याची माहिती पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव वाढणाऱ्या देशातील १० शहरात नाशिक कॉमन असल्याची माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. नाशिककर गंभीर नाहीत हे दुर्दैव असून बंधनं न पाळणाऱ्या नागरिकांवर आता कडक कारवाई होणार आहे. होम आयसोलेशन न पाळणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार असून अनेक आरोग्य पथकांची विशेष निर्मिती करण्यात येणार तसेच खबरदारी म्हणून शहरात कमांड कंट्रोल रूम सुरू करण्यात येणार असल्याचा महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले. बंधन न पाळणाऱ्या नागरिकांसोबत, शिस्त न पाळता चालढकल करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

शहरातील कोरोना नियंत्रण उपायांबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, शहरात ICU आणि व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत. वॅक्सिनचा ५ हजार डोसचा साठा आज प्राप्त झाला असून आणखी ५० हजार डोसची मागणी सरकारकडे केली आहे. शहरात ५३३ प्रतिबंधक क्षेत्र आहेत. १५ दिवसात पालिकेची बिटको रुग्णालयात सॅम्पल टेस्टिंग लॅब सुरू होणार असून दररोज २ हजार सॅम्पलची तपासणी होणार आहे. नोडल अधिकाऱ्यांकडून खाजगी लॅबकडून दिल्या जाणाऱ्या रिपोर्ट्सची तपासणी होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –