राज्यात आजपासून पुढील १५ दिवस कडक निर्बंध; कडक निर्बंधांत ‘या’ गोष्टी राहणार सुरु

संचारबंदी

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. राज्यात आणखी कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

‘आता कडक निर्बंधांची आवश्यकता आहे. जीव वाचवणं महत्वाचं आहे. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी मी निर्बंध पाळण्याचे हात जोडून आवाहन करत आहे. उद्या रात्री ८ वाजल्यापासून पुढील १५ दिवस १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. विनाकारण कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. याला जनता कर्फ्यू प्रमाणे जनतेनं मदत करावी. कोरोनाला मदत करणार की सरकारला मदत करणार हे जनतेनं ठरवायचं आहे.’ असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

कडक निर्बंधांत ‘या’ गोष्टी राहणार सुरु –

-सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद होणार नाही. अत्यावश्यक सेवांसाठी वाहतुकीचा वापर सुरू राहणार असून, वैद्यकीय सेवा, वाहतूक सप्लाय चेन, लस उत्पादक आणि वाहतूक करणारे, मास्क, जंतूनाशक उत्पादक आणि वितरक, वैद्यकीय कच्चा माल निर्मिती करणारे कर्मचारी, जनावरांचे दवाखान्यातील कर्मचारी, आदींसाठी प्रवास सुरु राहणार

-शितगृहे, वेअर हाऊसिंग, बस, ऑटो, विविध देशांची राजनैतिक कार्यालये, पावसाळी कामे सुरु राहतील

-सर्व बँका, सेबी, सेबीने मान्यता दिलेली कार्यालये, दूरसंचार सेवा, ई-कॉमर्स व्यवहार सुरु राहणार

-अधिस्विकृतीधारक पत्रकारांना सूट

-राज्यातील सर्व पेट्रोल पंप सुरु राहतील.

-शासकीय आणि खासगी सुरक्षा मंडळे, आयटी सेवा सुरू राहणार आहेत.

-तसेच हॉटेल्स रेस्टॉरंट्सवर पूर्वीप्रमाणेच निर्बंध कायम असून, टेक अवे, होम डिलिव्हरी सेवा सुरू राहतील. महत्वाचं म्हणजे रस्त्यावरील खाद्य विक्रेत्यांनाही परवानगी देण्यात आली असून, त्यांनाही सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत पार्सल व्यवस्थाच सुरू ठेवण्यात येता येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –